यंग स्टार चषक चा शिवमुद्रा कोल्हापूर संघ ठरला मानकरी

गेले तीन दिवस चालली कणकवलीत ही भव्य स्पर्धा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डीची दरवर्षी होते भव्य स्पर्धा
यंगस्टार चषक २०२४ च्या कबड्डीच्या महासंग्रामात अतीतटीच्या लढतीत अंतिम सामन्यात शिवमुद्रा कोल्हापूर संघाने अवघ्या ४ गुणांनी ज्वाली क्रीडा मंडळ मुंबई संघावर मात करत मानाच्या यंगस्टार चषकावर नाव कोरले. स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवमुद्रा कोल्हापूरचा नीलेश बरगे तर शिस्तबद्ध संघ म्हणून ग्रीफिन जिमखाना मुंबई संघाची निवड करण्यात आली. विजेत्या संघास ३५ हजार २८ रुपये, उपविजेत्या संघास २२ हजार २८ रुपये व चषक देऊन रविवारी उत्तररात्री झालेल्या पारितोषीक सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने निमंत्रित संघांची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा गेले तीन दिवस प्रकाशझोतामध्ये, येथील नगरपंचायतीच्या क्रीडा संकुलात खेळविण्यात आली. स्पर्धेचे हे २८ वे वर्ष होते. स्पर्धेत तृतीय क्रमांक ओमकल्याण ठाणे संघ तर चतुर्थ क्रमांक सुनील स्पोर्ट मुंबई यांना मिळाला. उत्कृष्ट चढाईपटू रजन सिंग (ज्वाली संघ मुंबई), उत्कृष्ट पकड दिनेश यादव (ज्वाली संघ मुंबई), बोनस किंग साईल पाटील (शिवमुद्रा कोल्हापूर) यांना गौरविण्यात आले. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत प्रत्येक दिवशी सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्यात आले. यामध्ये पहिल्या दिवशी सुमित गावडे (यंगस्टार कणकवली), दुसऱ्या दिवशी साईल पाटील (शिवमुद्रा तिसऱ्या दिवशी नीलेश बरगे (शिवमुद्रा कोल्हापूर) यांनाही रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
अंतिम दिवशी माजी खासदार नीलेश राणे, शिवसेना नेते व प्रतिथयश उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, उद्योजक अचित कदम, जिल्हा बँक संचालिका सौ. प्रज्ञा ढवण, माजी नगरसेवक बंडू गांगण, आनंद शिरवलकर, चारूदत्त साटम, राजू पारकर, नंदू टिकले, ज्येष्ठ कबड्डीपटू अनिल हळदिवे, संजय मालंडकर, गीता कामत यांनी स्पर्धेला भेट दिली. यावेळी नीलेश राणे यांचा मंडळातर्फे वाढदिवसही करण्यात आला. रविवारी उत्तररात्री झालेल्या पारितोषीक वितरण सोहळ्यास माजी नगराध्यक्षा सौ. मेघा गांगण, उद्योजक नंदू उबाळे, माजी नगरसेवक विलास कोरगांवकर, यंगस्टारचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ अण्णा कोदे, ज्येष्ठ पत्रकार रमेश जोगळे, माजी कबड्डीपटू अरूण जोगळे, गणेश तळगांवकर, विजय इंगळे, भरत उबाळे आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंचानी उत्कृष्ट पंचगिरी केली. स्पर्धेचे व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, समालोचन बाळू वालावलकर, अनिल यांनी केले. स्पर्धा नंदू वाळके, रुपेश परब, रुपेश वाळके, रुपेश केळुसकर, परेश परब, अमिता राणे, प्रियांका कोरगांवकर, ललित राणे, विकास वाळके, बाबू वातकर, रवी सावंत, शिवलिंग पाटील, चिन्मय माणगांवकर, रुचीर ठाकूर, अभिषेक चव्हाण, मयुर मेस्त्री, सुमित गावडे, भावेश मयेकर, प्रथमेश पेडणेकर, सुशांत सावंत, रंजन बाळके, संतोष सुतार, व्यंकटेश सावंत, ओंकार हळदिवे, सुनील तेली, संदेश आर्डेकर, रघू सुतार, हर्षद डिचोलकर, सुरज परब, ओंकार खांडेकर, रुद्रेश लाडगांवकर, प्रतिक कडुलकर, ओंकार येडवे, तुषार मोरये, नाना कोदे, माळाप्पा पुजारे यांनी मेहनत घेतली.
कणकवली प्रतिनिधी