निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचरा परिसरात पोलिसांतर्फे संचलन

आचरा – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचरा पोलिसांतर्फे सोमवारी सकाळी आचरा परिसरात संचलन करण्यात आले. संचलनाची सुरुवात पोलीस ठाणे येथून झाली. तेथून आचरा बाजारपेठ , आचरा तिठा, बस स्थानक, शाळा महाविद्यालय परिसर परत पोलीस ठाण्यात संचलनाची समाप्ती झाली.

संचलनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहा पोलीस उपनिरीक्षक महेश देसाई, महिला सहा पोलीस उपनिरीक्षक मीनाक्षी देसाई, महिला पोलीस हवालदार, स्वप्नाली तांबे, पोलीस हवालदार, सुदेश तांबे, मिलिद परब, दीपक चव्हाण, RCP प्लॅटूनच्या महिला अमलदार, पुरुष अमलदार व होमगार्ड सहभागी झाले होते.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या संचलनामध्ये सहभागी पोलीस निरीक्षक सुनील जाधव, महेश देसाई, मीनाक्षी देसाई आदींसह पोलीस कर्मचारी.

error: Content is protected !!