असलदे दिविजा वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी

नांदगाव आरोग्य केंद्रा मार्फत आयोजन

कणकवली (प्रतिनिधी)

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज शुक्रवारी सकाळी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांची मोफत आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधे देण्यात आली. सोबत समुदाय आरोग्य अधिकारी अमोल केंद्रे उपस्थित होते. वृद्धाश्रमातील सायली तांबे व कर्मचारी उपस्थित होते. वृद्धाश्रमात खूप दिवस झाले आरोग्य शिबीर घेण्यात नव्हते आले त्यामुळे रुग्णांची संख्या जास्त होती, यामध्ये 34 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!