370 कलम हटवण्याचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले

माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती

विरोधक कायद्याचा अपप्रचार करत आहेत

सीसीए ऍक्ट ची अंमलबजावणी केंद्र सरकारने केली. 2019 च्या जाहीरनाम्यात दिलेले वचन भाजपाने पूर्ण केले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचेही काश्मीर बाबत 370 कलम हटविण्याचे स्वप्न मोदी सरकारने पुर्ण केले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत कोकण भाजपाच्या वतीने करत असल्याचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले. विरोधक या कायद्याचा अपप्रचार करत आहेत की मुस्लिम बांधवांना ह्या कायद्याचा त्रास होणार आहे. हे खरे नसून उलट वरील तिन्ही देशातील जे मुस्लिम भारतात नागरिक्तवा शिवाय राहत आहेत अशा मुस्लिम बांधवांना आता भारतीय नागरिकत्व मिळणे सुलभ होणार आहे.1955 च्या कायद्यानुसार भारताचे नागरिकत्व कोणाला द्यावे याबाबत काही बदल करण्यात आले. 1947 पासून डिसेंबर 2014 पर्यंत भारतात बांगलादेश, पाकिस्तान अथवा अफगाणिस्तान मधून जे प्रताडीत निर्वासित भारतात राहिले आहेत त्यांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला आहे. हे तिन्ही देश पूर्वीच्या अखंड भारताचा भूभाग होता. बहुसंख्यांकांनी या देशात अल्पसंख्याकांचा छळ केला. असे निर्वासित भारतात राहत आहेत. अशा सर्व नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!