केंद्र शाळा आचरा येथील विकास कामांचा शुभारंभ

केंद्र शाळा आचरे नं1या शाळेसाठी मुलांना खेळासाठी मैदान बनविणे आणि शोषखड्डा या अंदाजित एक लाख पाच हजार कामाचा शुभारंभ आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या उपस्थितीत उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते केला गेला. यावेळी राजन गांवकर,जयप्रकाश परुळेकर, अभय भोसले,उदय घाडी, मुख्याध्यापक माने,ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर,योगेश गांवकर, चंदू कदम, अनुष्का गांवकर, सारीका तांडेल यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
आचरा–अर्जुन बापर्डेकर