खासदार विनायक राऊत यांच्या निधीतून सौंदाळे गावासाठी 9 लाखाची स्ट्रीटलाईट मंजूर

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदार संघात विविध विकास कामांचा शुभारंभ सुरु आहे. देवगड तालुक्यातील सौंदाळे गावासाठी खासदार विनायक राऊत यांच्या फंडातून 9 लाख रुपयांचा भरघोस निधी गावातील स्ट्रीटलाईट साठी मंजूर करण्यात आले आहेत याच कामाचा शुभारंभ आज युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. सौंदाळे गावच्या सरपंच मनाली कामतेकर यांच्या हस्ते श्रीफल फोडून स्ट्रीटलाईट च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सौंदाळे गावात या निधीतून एकूण 30 स्ट्रीटपोल टाकण्यात येणार आहेत. गावकऱ्यांची मागणी खासदार विनायक राऊत यांनी पूर्ण केल्याबद्दल नागरिकांमधून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत तालुकाप्रमुख जयेश नर, युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी, विभाग प्रमुख रमाकांत राणे, शाखाप्रमुख संदीप गुरव, महेश मोंडे, सरपंच मनाली कामतेकर, उपसरपंच विष्णू राणे, ग्रा.पं.स. अक्षता मोरये, प्राची राणे, विश्वनाथ राणे, मा.प.स. सदस्य प्रकाश गुरव, भरत मिठबावकर, चंद्रकांत कदम, कृष्णा कोंडकर, रेवती राणे, राजा मिठबावकर, जगन्नाथ गुरव,आदी गावातील ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.
देवगड प्रतिनिधी