उबाठा सेनेचे नांदगाव सोसायटी संचालक आब्बास बटवाले यांचा भजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत

कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशी सोसायटी उबाठा सेनेचे संचालक आब्बास अब्दुल बटवाले यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.कणकवली मतदार संघात आमदार राणे यांनी विकासकामांचा सुरू असलेला झाझावात यामुळे प्रभावित होवून भाजपात प्रवेश केला तर उबाठा सेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांच्या त्रासाला आणि मनमानी कारभाराला कंटाळून आब्बास बटवाले यांनी उबाठा पक्षाला राम राम केल्याची माहिती दिली.
या पक्षप्रवेशावेळी यावेळी माजी जिल्हापरिषद सदस्य संजय देसाई, भाजप तालुका सचिव श्री. पंढरी वायगणकर,भाजप अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष श्री. रज्जाक बटवाले,महीला तालुका अध्यक्ष हर्षदा वाळके,नांदगाव सरपंच श्री.भाई मोरजकर,उप सरपंच इरफान साटवीलकर,गवस साटवीलकर, याशिन बटवाले,जाफर कुणकेरकर, तोशोम नावलेकर, याशिर मासके, याच्या सह इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!