टोपीवाला हायस्कूल,माजी विद्यार्थी संघटना ‘मालवण मेळावा २०२४’
मे महिन्याचा दुसरा शनिवार हा ‘माजी विध्यार्थी दिन’ म्हणून साजरा केला जातो याचेच औचित्य साधून ‘टोपीवाला माजी विद्यार्थी संघटना’ या वर्षी “माजी विद्यार्थी स्नेह मेळावा”शनिवारी दि. ११ मे २०२४ रोजी दुपारी ३.०० ते ७.०० या वेळेत आपल्याच टोपीवाला हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करत आहे.
या पूर्वी मुंबई व पुणे येथील स्नेह मेळाव्यास आपला भरभरून प्रतिसाद मिळाला. मालवण स्नेह मेळावा तर आपल्या टोपीवाला शाळेतच होणार आहे. कार्यक्रमाची सविस्तर माहिती लवकरच देऊ..
शाळेच्या प्रांगणात एकत्र येऊ, थोडी मजा करू.. येताय ना..
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!
चला तर.. मुंबई, पुणे व मालवण बाहेरून येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी प्रवासाची तिकीट अवश्य बुक करा आणि दिवस राखून ठेवा..
शनिवार ११ मे २०२४
वेळ: दु . ३.०० ते ७.००
टोपीवाला हायस्कूल, मालवण
अधिक माहितीसठी संपर्क.
शेवडे सर ९४२११४५६९९
संजय ९४२२५९६९८७
धन्यवाद..
निमंत्रक,
मालवण टीम
माजी विद्यार्थी संघटना.