पिरावाडी प्राथमिक शाळेत विज्ञान दिवस उत्साहात

हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळा आचरा पिरावाडी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध प्रयोगांनी विज्ञान दिन अविस्मरणीय ठरला.
डॉ ऐ पी जे अब्दुल कलाम विज्ञान व तंत्रज्ञान प्रयोगशाळा उद्घाटन सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते केले गेले. यावेळी त्यांच्या समवेत मुख्याध्यापक सुभाष नाटेकर,उपसरपंच संतोष मिराशी तसेच ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, सौ. पूर्वा परेश तारी तसेच सौ. मनाली राणे ,ग्रामोन्नती मंडळ उपाध्यक्ष श्री. मंदार खोबरेकर कार्यकारणी सदस्य श्री. अनिल करंजे विठ्ठल धुरी ,जगन्नाथ जोशी ,विठ्ठल जोशी ,समीर बावकर . विष्णू कुबल, श्री. परेश तारी तसेच शाळा समिती अध्यक्ष श्री. नित्यानंद तळवडकर तसेच सौ. मंजीरी खोबरेकर, सौ. दिशा तळवडकर, श्रीमती. रमिता जोशी, सौ. नंदिनी पांगे, सौ. तन्वी जोशी, सौ. अप्सरी मुकादम, श्री. व सौ. कराळे तसेच अरुण धुरी, प्रफुल्ल नलावडे , आणि गावातील इतर मान्यवर महनीय व्यक्ति तसेच पालक वर्ग आणि शालेय शिक्षक उपस्थित होते.
आचरा–अर्जुन बापर्डेकर





