युवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्रामवाचनालय यांच्यावतीने मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा

युवा संदेश प्रतिष्ठान आणि कनेडी पंचक्रोशी ग्रामवाचनालय यांच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय येथे ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच हस्ताक्षर, निबंध आणि कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे उद्घाटन सकाळी ठीक १०.३० वा जि प शाळा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे संपन्न झाले यावेळी संजना संदेश सावंत-अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान, मोहन सावंत, माजी शिक्षाधिकारी, विजय भोगटे, संजय ऊर्फ बाबू सावंत सरपंच, मयुरी मुंज, मिनल पवार, नाना काणेकर, बावतिस डीसोजा , कुबडे, मिलिंद गावकर, केंद्र प्रमुख उत्तम सुर्यवंशी, मुख्याध्यापक माधवी राणे, के पी सावंत,सत्यवान सावंत आणि बहुसंख्येने शिक्षणप्रेमी उपस्थित होते. वाचनालय उपाध्यक्ष श्री मोहन सावंत यांनी प्रास्ताविक करताना भाषा दिनाचे महत्व स्पष्ट केले. उपस्थितांचे पुस्तक देउन स्वागत करण्यात आले.
मराठी भाषा दिन निमित्त आयोजित स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिलाला. सर्व स्पर्धा मध्ये 358 विद्यार्थी सहभागी झाले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री नरेंद्र चिंदरकर, प्रशांत कदम, राजाराम भिसे, संतोष तांबे, स्वरुपा ढवल, रेश्मा सावंत, प्रांजली मसुरकर, कविता पावसकर, व्ही टी सुतार, जगन्नाथ गावकर यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री संदीप तांबे यांनी केले.
स्पर्धा यशस्वी केल्या बद्दल संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!