कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांना पदोन्नती

वाडा – पालघर येथील पदोन्नतीत बदल करून पेंडुर ग्रा. रुग्णालयात नियुक्ती

कणकवली : कणकवली तालुक्यातील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी पदावर पदस्थापना असलेले व कणकवली तालुका प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांची काही दिवसांपूर्वी वाडा – पालघर या ठिकाणी पदोन्नती ने वैद्यकीय अधीक्षक या पदावर पदस्थापना झाली होती. परंतु त्यांना कार्यरत असलेल्या ठिकाणाहून कार्यमुक्त केलं नव्हतं. आता पुन्हा त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली असून, मालवण तालुक्यातील पेंडुर कट्टा या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक या पदावर त्यांना पदस्थानपना देण्यात आली आहे.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!