शुभांगी पवार यांचा मुंबईत जयश्री जयराम धारपवार प्रतिष्ठान यांच्याकडून सत्कार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या लोकांच्यावर होणारा भेदभाव नष्ट व्हावा , विशेषत देवळात मिळणारी अपमानास्पद वागणूक बंद व्हावी यासाठी काम करणाऱ्या कणकवली येथील शुभांगी सदाशिव पवार यांचा शिवाजी मंदिर, दादर, मुंबई इथे माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर यांच्या उपस्थितीत प्रा स्नेहा आणि डॉ श्रीकांत धारपवार दंपती कडून सन्मानपत्र, पुष्प गुच्छ आणि शाल देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी या मुद्द्यांवर आधारीत डॉ श्रीकांत धारपवार लिखित ” अंधाराचे सोबती ” या सामाजिक नाटकाचा शुभारंभ प्रयोग सादर केला गेला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मंदिरात प्रवेश नसणे , ओटी गाऱ्हाणे वेगळ्या ठिकाणी करणे , अनुसूचित वस्तीत देवाचे निशाण, पालखी न जाणे अशा कृत्यांनी अनुसूचित जातीच्या लोकांचा आजही अपमान केला जात आहे. ही प्रथा बंद करावी यासाठी शुभांगी पवार यांनी जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीना तीन वेळा पत्रे पाठवली आहेत. या मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधान , मुख्यमंत्री आणि विविध अधिकाऱ्यांना मिळून सुमारे पंधराशे पत्र पाठवली आहेत.
यावेळी त्यांचे पुत्र डॉ सतीश पवार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज.वि.पवार, उर्मिला पवार,’ सोनबा’कार रमाकांत जाधव, प्रकाश सरवणकर, नितीन तागडी IAS,additional commissioner,Customs, नितीन साळुंखे, संजय कुमार G.M.R.B.I, डॉ मिलिंद शेजवळ, प्रा राजेंद्र मुंबरकर हे मान्यवर उपस्थित होते.