कोळपे गावातील ठाकरे गट युवासेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपा पक्षात प्रवेश

आमदार नितेश राणेंचा ठाकरे गटाला जोरदार धक्का

काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा दौरा झाला. आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात कणकवली मतदारसंघात पक्ष प्रवेशांच्या रांगा लागल्या. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली कोळपे गावातील उबाठा सेनेचे युवासेनेचे कार्यकर्त्यांनी कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी आज सोमवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी रजाक लांजेकर, अमिन लांजेकर, मज्जिद चोचे, अल्लाउद्दिन लांजेकर, मुबारक नाचरे, तोसिफ नाचरे, तोफिक नाचरे, मुबारक लांजेकर, अब्दुल रेहेमान लांजेकर, हुसेन इ. लांजेकर, गुलाम रसूल लांजेकर, रिजवान लांजेकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजप जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, माजी सरपंच हमीद लांजेलर, हमीद नाचरे, ग्रामपंचायत सदस्य समीर चोचे, सिराज नाचरे, कादिर थोडगे, नासिर नंदकर, मज्जिद नंदकर, शाबुद्दीन चोचे, अकबर लांजेकर, कौयूम नंदकर, रमजान चोचे, शकीब नंदकर, हुसेन लांजेकर, मिराज नाचरे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रवेशकर्त्यांनी आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून होत असलेली विविध विकासकामे आणि जनतेला दिलेल्या अश्वासनांची पूर्तता पहाता आम्ही यापुढे आमदार नितेश राणेंसोबत राहून त्यांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!