आचरेतील पत्रकारांचा शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे मित्रमंडळाकडून सन्मान….!

शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य
आचरा,-अर्जुन बापर्डेकर
शिवसेना मालवण तालुका अर्जुन बापर्डेकर महेश राणे मित्रमंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा 19 फेब्रुवारी रोजी मोठया दिमाखात व उत्साहात सपन्न झाला. या विविधांगी कार्यक्रमा वेळी महेश राणे मित्रमंडळाकडून आचरा पत्रकार तसेच पंचक्रोशीतील भजनी बुवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पत्रकार
अर्जुन(दादा) बापर्डेकर, परेश सावंत, उदय बापार्डेकर, विवेक(राजू)परब,सिद्धेश आचरेकर यांचा तर कै. भाई खांडाळेकर स्मृती उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त मसुरे प्रतिनिधी झुंझार पेडणेकर यांचा
शाल, श्रीफळ, पुप्षगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष महेश राणे,संतोष कोदे, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत गोलतकर, उपविभागीय अध्यक्ष अश्विन हळदणकर, आचरा सोसायटी चेअरमन अवधूत हळदणकर, अजित साटम, अमर पळसबकर, ग्रामपंचायत सदस्य महंद्र घाडी, चंदू कदम, सचिन हडकर यांसहअन्य मान्यवरआदी उपस्थित होते.रात्रौ बुवा श्रीकांत शिरसाठ विरुद्ध बुवा प्रथमेश चव्हाण यांच्या डबलबारी भजनी सामन्याने उपस्थितांचे मनोरंजन केले.