दारिस्ते मुख्य रस्त्याचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन

ग्रामस्थांनी मानले खासदार विनायक राऊत व उत्तम लोके यांचे आभार

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते दारिस्ते गावच्या मुख्य रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर, लोकसभा संघटक सचिन सावंत, कणकवली विधानसभा, तालुकाप्रमुख डॉ प्रथमेश सावंत,राजू राठोड युवासेना जिल्हा समन्वयक, उत्तम लोके , युवासेना तालुकाप्रमुख, हेमंत सावंत, उप तालुका प्रमुख , शिवसेना शाखा अध्यक्ष अविनाश गावकर, युवसेना शाखा प्रमुख विजय गावकर , माजी सरपंच केशव मेस्त्री, दीपक मेस्त्री, विलास सावंत , श्रीराम गुरव, आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अशा प्रकारे येणाऱ्या काळात विकास काम आपल्या हातून आमच्या गावामधे होउ दे, आणि 4-4 वर्षे खोटं बोलणाऱ्या लोकांचा सुडासाफ करा अशी भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्याची माहिती उत्तम लोके यांनी दिली.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!