राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी केले छत्रपतींना अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध ठिकाणी दिल्या भेटी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथे आज शिवजयंती निमित्त शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,आनंद पारकर, चेतन मुंज यांनी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत रिजा नाईक शहर अध्यक्ष इम्रान शेख प्रांतिक सदस्य विलास गावकर, प्रांतिक सदस्य दिलीप वर्णी,शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटणीस गणेश चौगुले, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर गुरुजी, जिल्हा सचिव सतीश पाताडे,जाहीर फकीर, आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!