राज्यसभेसाठी विशाल परब यांना खासदारकी द्यावी भाजप कार्यकर्त्यांनी केली मागणी

सिंधुदुर्ग-: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार असून या राज्यसभेच्या जागेसाठी सिंधुदुर्गातून विशाल परब यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.यातअनेक उमेदवारांची चाचपणी सुरूआहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे विनोद तावडे यांची नावे सध्या आघडिवर आहेत. शिंदे गट व अजित पवार गटाकडून कोणाला मिळणार संधी याची देखील सुरु आहे जोरदार चाचपणी आहे.अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांच्या नावाची देखील सुरु आहे चर्चा आहे.
सिंधुदुर्गातील भाजपचे युवा कार्यकर्ते विशाल परब यांच्या नावाची सुद्धा आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे विशाल परब यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत. गेल्या काही वर्षात कोकणात भाजपच्या माध्यमातून विविध विकास कामाच्या माध्यमातून विशाल परब यांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. तसेच पक्षालाही उर्जिता वस्था देण्याचं काम केलं आहे. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सद्या जोर धरू लागली आहे

error: Content is protected !!