शिवसेना उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत यांची पक्षातून हकालपट्टी

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केले 6 वर्षांसाठी बडतर्फ
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका
पक्षविरोधी कृती व पक्ष नेतृत्वाच्या हितास बाधा केल्याप्रकरणी शिवसेना पक्षाचे कणकवली उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत यांची पक्षातून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी याबाबतचे प्रसिद्धी पत्रक दिले आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे आपण केलेल्या पक्षविरोधी कृती तसेच पक्षाच्या नेतृत्वास वेळोवेळी हितास बाधा येईल असे वर्तन करत असल्याचे आढळून आले आहे. तरी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडे आपल्या कृत्याची खातरजमा करून आपणांस उपतालुकाप्रमुख पदावरून निलंबित करण्यात येत आहे. तसेच वरिष्ठांच्या कानावर या सर्व गोष्ठी घातल्या, त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार आपले पक्षातून 6 वर्षे साठी बडतर्फ करण्यात येत आहे. असे श्री आंग्रे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे
कणकवली/ प्रतिनिधी