नडगिवे घाटात कंटेनर पलटी

चालक जखमी ,लाखोंचे नुकसान

नडगिवे बांबरवाडी येथील अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटून कंटेनर पलटी झाला.गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या या कंटेनर चा 11:30 च्या सुमारास नडगिवे घाटात अपघात झाला.या अपघातात कंटेनर चे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे.अपघातात वाहन चालकाला दुखापत झाली असल्याचे समजत असून त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.अपघाताची बातमी मिळताच खारेपाटण दुरक्षेत्र चे पोलीस कॉन्स्टेबल मोहिते यांनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!