शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त कुंभारमाठ हुतात्मा प्रभाकर विश्राम रेगे स्मारक येथे अभिवादन

देशासाठी हुतात्मा पत्करलेल्या हुतात्मांसाठी अभिवादन करण्यासाठी ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा करण्यात येतो यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त कुंभारमाठ हुतात्मा प्रभाकर विश्राम रेगे स्मारक येथे अभिवादन करण्यात आले यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाईसाहेब गोवेकर, तालुकाप्रमुख हरिश्चंद्रजी खोबरेकर, शाखाप्रमुख सदानंदजी करंगुटकर, युवासेना उपविभागप्रमुख ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, युवासेना शाखाप्रमुख स्वामीदास शिरोडकर, अंकुश गावकर, संस्कार करंगुटकर आदी उपस्थित होते.





