अखेर कुडाळ एमआयडीसीतील कचरा प्रश्न मार्गी !

एमआयडीसी प्रशासनाकडून साफसफाई मोहीम

कुडाळ, प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून याबाबत काही दिवसांपूर्वी येथील नागरिकांनी आवाज उठविला होता. अखेर एमआयडीसी प्रशासनाला जाग आली आहे. आज, २६ जानेवारी रोजी एमआयडीसी प्रशासनाकडून कचरा साफसफाई मोहीम सुरू केली आहे. एमआयडीसीत होणारा कचरा हा प्रामुख्याने येथे निवासी संकुलात राहणारे नागरिक आणि अन्य नागरिकांकडून होत असून तो उद्योजकांकडून होत नसल्याचे
पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, पिंगुळी व्यापारी संघटना उपाध्यक्ष दीपक गावडे, गुरू सडवेलकर, भूषण तेजम, अजित मार्गी, समीर सराफदार, वर्षा कुडाळकर, योगेश तुळसकर यांनी स्पष्ट केले होते.

error: Content is protected !!