संदिप परब यांच्या फुटपाथ एक विद्यापीठ कविता संग्रहावर ३१ जानेवारीला परिसंवाद

पणदूरच्या संविता आश्रमात संध्याकाळी ५-०० वाजता संपन्न होईल परिसंवाद
पणदूर – जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांच्या फुटपाथ एक विद्यापीठ या कविता संग्रहावर ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ५-०० वाजता परिसंवाद पणदूरच्या संविता आश्रमात आयोजण्यात आला आहे.
    साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रविण बांदेकर हे परिसंवाद कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवतील. तर कार्यक्रमाचे संयोजक असलेले कवि विठ्ठल कदम (सिंधुदुर्ग साहित्य संघ- सावंतवाडी) हे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील. संत राऊळ महाराज महाविद्यालयातील प्रा.डाँ.शरयू आसोलकर , आरकेडी हायस्कूलच्या प्रा.श्वेतल परब, कवि किशोर वालावलकर,  प्रा.स्मिता खानोलकर हे प्रमुख परिसंवादातील भाष्यकर्ते असतील.
 कवि मनोहर परब, कवयित्री कल्पना बांदेकर , एकनाथ कांबळे आणि शालीनी मोहाळे  हे कविता वाचन करतील.  आभारप्रदर्शन पत्रकारः राजेश मोंडकर हे करतील.सूत्रसंचलन   डाॅ.सुमेधा धुरी करतील. या वेळी संस्थेचे अध्यक्ष मा. लीलाधर घाडी , सल्लागार मा. अँड.संदीप निंबाळकर, अँड. देवदत्त परूळेकर .डाॅ कवी गोविंद काजरेकर , कवी वीरधवल परब ,कवी प्रा.मोहनकुभांर हरिहर वाटवे  हे मान्यवर उपस्थित राहणार असूनसंदिप परब यांचा मोठा मित्रपरिवार या साहित्यिक समारंभास उपस्थित राहणार आहे.
रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळण्यासाठी कार्यरत असलेले संदिप परब हे एक संवेदनशील कविमनाचे व्यक्तीआहेत. त्यांनी निम्म्याहून आधिक आयुष्य फुटपाथवरच्या वंचितांसमवेत व्यतीत केले.या जीवनानुभवातून फुटपाथवरचे वंचित जीवन त्यांच्या कवितेतून उतरले आहे. निराधारांच्या जीवनाशी एकात्म होण्यासाठी संदिप अनेकदा फुटपाथवर झोपले आहेत.
किसन चौरे
 
	




