कणकवली एस.टी स्टॅन्ड आवारातील खळबळजनक बातमी.

कणकवली बस स्थानक आवारातील विहिरींमध्ये सांडपाण्याचा होतोय निचरा-मनसेने वेधले एस.टी प्रशासनाचे लक्ष.

मनसे कणकवली तालुका अध्यक्ष श्री. शांताराम सादये यांचे विभाग नियंत्रक यांना निवेदन.

पंधरा दिवसांच्या आत तातडीने कार्यवाही न केल्यास मनसे स्टाईल ने उत्तर देणार.

कणकवली/मयुर ठाकूर.

कणकवली बस स्थानकावरील आस्थापने कार्यालय व प्रवाशांसाठी असलेले पिण्यासाठी पाणी तसेच इतर वापरासाठी असलेले पाणी यासाठी असलेल्या विहिरींमध्ये सांडपाण्याचा निचरा होत असल्याची खळबलजनक बाब मनसेने समोर आणली आहॆ.एस टी डेपो प्रशासनाचे या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष होत असून याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी कणकवली तालुका अध्यक्ष श्री. शांताराम सुरेश सादये यांनी आज एसटी विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग विभाग यांना निवेदन दिले.सांडपाणी जमिनीमध्ये झिरपून विहिरींमध्ये जात असल्याची खळबळ जनक बाब मनसे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उघड झाली आहे.सदर विहिरीं मधील पाण्यावर पिवळसर थर निर्माण झाला असून सदरचे पाणी हे उपहारगृहातील ग्राहक तसेच एसटी मंडळातील कर्मचारी व प्रवासी पीत असल्याकारणाने सदर पाण्यामुळे रोगराई पसरू शकते.सदर पाण्याची गुणवत्ता ही आपणाकडून नियमानुसार वारंवार चेक करणे गरजेचे आहे.परंतु तसे होताना दिसत नाही.त्यामुळे सदरच्या दूषित पाण्याच्या पुरवठ्याने सदरचा पाणीपुरवठा हा प्रवाशांच्या तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला हानिकारक असल्याने तो त्वरित बंद करून पिण्यायोग्य पाण्याच्या टँकरद्वारे अथवा इतर मार्गाने पुरवठा करून सदर गैरसोय दूर करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कणकवली तालुका अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी आज जाब विचारला.तसेच मनसैनिक आपणास पंधरा दिवसाची मुदत देत असून पंधरा दिवसांमध्ये त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपणास आपल्या पद्धतीने कार्यवाही केली जाईल आणि त्यास सर्वस्वी जबाबदार आगार प्रमुख,विभाग नियंत्रक,एसटी महामंडळ प्रशासन जबाबदार असेल असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी तालुका अध्यक्ष शांताराम सादये,माजी तालुका अध्यक्ष दत्तराम बिडवाडकर,मनसे सैनिक दत्ताराम अमृते,अतुल दळवी,अक्षय मालवनकर,रवी गवळी,प्रकाश पावसकर व इतर मनसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!