प्रभू श्रीरामाच्या मंदिर उदघाटन व श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापणे निमित्त वायंगणी येथे विविध कार्यक्रम संपन्न

वायंगणी येथे राम मंदिर उद्घाटनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.अयोध्या येथील राम मंदिरातील श्रीरामांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ग्रामदैवत श्री आदिनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मंदिरात अयोध्या येथील राम मंदिराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळी विविध धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांची सुस्वर भजने गायली. भजनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा महाप्रसाद गावातील सर्व ग्रामस्थ महिला पुरुष यांनी एकत्र येऊन बनवला होता. गावातील सर्व ग्रामस्थांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला..गावात साफसफाई करण्यात आली .रात्री आदिनाथ मंदिरात तसेकंग संपूर्ण गावात दिव्यांची रोषणाई करण्यात आली.छोट्या मुलांसाठी ,महिलांसाठी,व मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आले. रात्री पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ एकत्र येत महाप्रसाद बनवला व भजन गायली गेली. या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे गावातील वातावरण राममय झाले होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण