श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला मारुती मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

अनंत पिळणकर यांच्यासह ग्रामस्थांनी नवीन कुर्ली वसाहतीतील मारुती मंदिर केले झगमगीत

अयोध्येत उद्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. हिंदू धर्मियांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. यानिमित्ताने फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथील मारुती मंदिराची साफसफाई करण्यात आली. प्रभू श्रीरामाचे हनुमान हे परमभक्त होते. उद्या श्रीरामांच्या मूर्तीची अयोध्यानगरीत होत असलेली प्राणप्रतिष्ठापना ही हिंदूंसाठी गौरवाची बाब आहे. 600 वर्षांचे हिंदूंचे स्वप्न पूर्ण होत आहे. या पूर्वसंध्येला मारुती मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या उपस्थितीत ही स्वच्छता करण्यात आली.मंदिराच्या सभागृहाची सफाई करतानाच परिसरात उगवलेले रानगवत काढण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर. उत्तम तेली. महेश चव्हाण. विष्णूभाई पिळणकर. तुषार पिळणकर. सुजल शेलार. शंकर राणे. प्रवीण पार्टी रमेश हिंदळेकर. उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!