रिगल कॉलेज कणकवली ची विद्यार्थिनी कु समिधा राउत हिचे राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुयश

रिगल कॉलेज कणकवली ची विद्यार्थिनी कु समिधा राउत (FYBCA) हिने लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अॅग्रो प्रोडक्ट (पाककला) स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक मिळविला. तिने प्राप्त केलेल्या या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे रिगल कॉलेज कणकवली तर्फे हार्दिक अभिनंदन.
या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, कृषी संचालनालय महाराष्ट् राज्य व क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आल्या होत्या. रिगल एज्यूकेशन सोसायटी अध्यक्ष मा. संजयराव शिर्के सर, संचालिका डॉ. सुमिता शिर्के,प्राचार्य तृप्ती मोंडकर तसेच सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी वर्ग यांच्याकडून कु. समिधा हिचे कौतुक व शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रतिनिधी, कणकवली