कणकवली मध्ये व्हिडिओ गेम पार्लर वर मोठी कारवाई

व्हिडिओ गेम च्या तब्बल 44 मशीन जप्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्हिडिओ गेम पार्लर व्यावसायिकांमध्ये मध्ये मोठी खळबळ

कणकवली शहरातील तब्बल 5 व्हिडिओ गेम पार्लरवर जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. कणकवली शहरातील व्हिडिओ गेम पार्लर चे चालक-मालक यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात येत असून, कणकवली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे व्हिडिओ गेम पार्लर चालकांमध्ये एकच खळबळ माजली आहे. या कारवाईमध्ये कणकवली मधील पाच व्हिडिओ गेम पार्लर मालक, पाच चालक व दोन खेळाडू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत चा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यात 40 हजार रुपयांची रोख रक्कम व 44 व्हिडिओ गेम च्या मशीन जप्त करण्यात आल्या. कणकवली पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. व्हिडिओ गेम पार्लर वर त्यापूर्वी कारवाईची अनेकदा मागणी करण्यात आली होती. व्हिडिओ गेम पार्लर मध्ये अनेक जणांचे पैसे या मध्ये गेल्याने अनेक जण देशोधडीला लागले होते. या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांच्या या कारवाईचे कणकवली करांमधून स्वागत केले जात आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, पोलीस उपनिरीक्षक शेगडे, पोलीस नाईक रुपेश गुरव, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथे, सुशांत कोलते, सागर जाधव, रणजीत दबडे, राज आगाव, रघुनाथ जांभळे, विनोद चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

दिगंबर वालावलकर, कणकवली

error: Content is protected !!