नांदगाव हायस्कूल मध्ये स्वच्छतेचा निश्चय

स्वच्छता मिशनच्या माध्यमातून काम
स्वच्छता मिशन, सिंधुदुर्गच्या वतीने कणकवली तालुक्यातील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे स्वच्छता जनजागृती करण्यात आली आणि संस्थाचालक शिक्षक विद्यार्थी यांनी स्वच्छतेचा निश्चय केला. यावेळी स्वच्छता शपथ स्वच्छता मिशनचे गणेश जेठे यानी दिली.
यावेळी नांदगाव पंचक्रोशी शिक्षणसंस्था चेअरमन नागेश मोरये,खजिनदार सुभाष बिडये, उद्योजक व पत्रकार संजय सावंत, पत्रकार सचिन राणे, उत्तम सावंत, मोहन पडवळ, मुख्याध्यापक सुधीर तांबे, शिक्षक उपेंद्र पाटकर, शर्वरी सावंत, संजय सावंत, रघुनाथ कारेकर, कविता नलावडे, राजेश नारकर,श्रावणी मोरये, श्रीकांत सावंत, सुनिल पारधिये,संतोष गोसावी, प्रभाकर साळुंखे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी जेठे यानी आपण व आपले सहकारी संपूर्ण जिल्ह्य़ात स्वच्छतेबाबत सामाजिक कार्य म्हणून स्वच्छता जनजागृती मुलांपासून झाली पाहिजे यासाठी स्वच्छतेचा निश्चय करत आहोत आहोत. यासाठी सर्वाच्या सहकार्यातून स्वच्छता मिशन काम करीत आहे असे सांगितले.यावेळी नागेश मोरये यानी मनोगत व्यक्त केले तसेच मुख्याध्यापक सुधीर तांबे यानी आभार मानले. विशेष म्हणजे नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल परिसर खूपच स्वच्छ आणि टापटीप होता. संस्था अध्यक्ष नागेश मोरये आणि मुख्याध्यापक तांबे सर यांनी आम्ही सतत शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मुलांमध्ये जनजागृती सतत सुरू असते.पुन्हा एकदा सर्वांनी स्वच्छतेचा निश्चय केल्यामुळे मुलांकडून शाळेबरोबरच आपले घर आणि गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश घरोघरी जाईल अशी आशा व्यक्त केली.
कणकवली, प्रतिनिधी