अंबर गृहप्रकल्पाच्या नावाखाली 14 लाखांची फसवणूक प्रकरणी तेजस घाडीगावकर व एल्टन नरोन्हा यांना जामीन मंजूर

आरोपी तर्फे ऍड. प्रतीक साखळकर व ऍड. अक्षय चिंदरकर यांनी केला युक्तिवाद
सन 2021 ते 2023 या कालावधीमध्ये गुन्ह्यातील आरोपी तेजस सागर घाडीगावकर, विनोद गिरधर परमार, एल्टन पीटर नरोन्हा , निलेश अवघडे यांनी एकमेकांचे संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मौजे जानवली तालुका कणकवली येथे मुंबई – गोवा महामार्गालगत विना परवाना सेव्हन स्क्वेअरफिट कन्स्ट्रक्शन अंबर नावाने गृह प्रकल्पाचे बोर्ड लावून खोटी जाहिरात करून नवीन बंगला बांधून देतो असे फिर्यादी शामल तळदेवकर व गायत्री मुताडक यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून बंगला खरेदी करिता ॲडव्हान्स रक्कम रुपये 14 लाख स्वीकारून सदरची रक्कम स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वापरून फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वासघात करून त्यांना बंगला बांधून न देता व घेतलेली रक्कम परत न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली म्हणून तेजस घाडीगावकर, विनोद गिरधर परमार, एल्टन पीटर नरोन्हा , निलेश अवघडे यांचेवर कणकवली पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता कलम 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ऑगस्ट 2023 पासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी तेजस घाडीगावकर व एल्टन नरोन्हा यांनी न्यायालयात जामिन अर्ज केला असता त्यांचा कणकवली येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांनी प्रत्येकी 15 हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला.
कणकवली प्रतिनिधी