साळीस्ते येथील बिबट्याच्या शिकार प्रकरणी संशयित आरोपीची जामीनावर मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. राजेंद्र रावराणे, ऍड. गायत्री मालवणकर यांचा युक्तिवाद
कणकवली – बिबट्याची शिकार केल्याच्या आरोपाखाली अटक आरोपी श्री. अनिल कणेरे याला सशर्त जामीनावर मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. टी. एच. शेख यांनी दिली. आरोपी तर्फे ऍड. राजेंद्र रावराणे व ऍड. गायत्री मालवणकर यांनी काम पाहीले.
याबाबत सविस्तर हकिगत अशी की, दि. ८/०१/२०२४ रोजी मौजे साळीस्ते रामेश्वरनगर ता. कणकवली येथील श्री. विलास वरे यांच्या आंबा, काजू कलम बागेमध्ये बिबट्या फासकीत अडकलेची माहिती मिळाल्यावरून वनअधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी पहाणीकरीता वन्य प्राणी बिबट्या हा लोखंडी वायर रोपच्या फासकीमध्ये अडकल्याने मृत झाल्याचे आढळून आले होते. सदर बागेमध्ये देखरेख करणारे अनिल आत्माराम कणेरे यांना फॉरेस्ट पोलीसांनी जागीच अटक करून घटनास्थळी वन्यप्राणी बिबट्याचे शव ताब्यात घेतले होते. तसेच वायर रोप देखील जप्त करण्यात आला होता. सदर बाबत वनपाल फोंडा यांनी गुन्हा क्र. डब्ल्यू एल ०१/२०२४ चा जारी केला व सदर प्रकरणी महाराष्ट्र शासनातर्फे श्री. रा.द. घुणकीकर, वनक्षेत्रपाल कणकवली यांनी फिर्याद दाखल केली. त्याआधारे अनिल आत्माराम कणेरे यांचेविरूध्द वन्यजीव (संरक्ष अधिनियम १९७२ (सुधारणा २०२२) चे कलम ९,३९,५१,५२ अन्वये गुन्हा दाखल कर आला. आरोपीस कणकवली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची वनकोठडी देण्यात आलेली होती. वनकोठडी संपलेनंतर आरोपीस जामीन मिळणेकरीता दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर सुनावणी घेन्यात आली. सुनावणी अंती मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली श्री. टी. एच. शेख य आरोपीस रक्कम रू. १५,०००/- च्या जामीनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. तसेच तपासकामी फॉरेस्ट पोलीसांनी बोलावताच हजर रहाण्याची तसेच दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत रहिवासाचे ठिकाण सोडून न जाण्याची अट देखील घालण्यात आली.
कणकवली प्रतिनिधी