शिवसेना युवासेना (उ.बा.ठा) पक्षा तर्फे कुंभवडे गावात मल्हार नदीवर बंधारे

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक होते उपस्थित
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल लागलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर आज कुंभवडे गावात शिवसेना-युवासेना (उ.बा.ठा) पक्षा तर्फे कुंभवडे गावात मल्हार नदीवर पाणी अडवण्यासाठी ३ बंधारे घालण्यात आले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते. या बंधाऱ्यांमुळे कुंभवडे गावच्या पाण्याची सोय होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ व महिला वर्गाकडून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, कुंभवडे गावच्या सरपंच सौ. विजया कानडे, ग्रामपंचायत सदस्य संदीप सावंत, युवासेना तालुका समन्व्यक गुरुनाथ पेडणेकर, तेजस राणे, भास्कर सावंत, सुधीर सावंत, माजी सरपंच आप्पा तावडे, नामदेव दळवी, देवेंद्र दळवी, सुनील कानडे, दीपक चव्हाण, विजय कानडे, रघुनाथ पेडणेकर, सत्यविजय सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





