अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर

संशयितआरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद

कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियाद्वारे मैत्री करून त्याचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी दिलीप दशरथ पवार (कणकवली ) याची सिंधुदुर्ग ओरोस येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 1 तथा विशेष न्यायाधीश श्रीमती एस एस जोशी यांनी पन्नास हजार रुपयांच्या जात मुचलक्याच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांनी काम पाहिले.

दिनांक 23/ 9/ 2023 रोजी फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी त्यांचे शेजारी गणपती निमित्त असलेल्या जेवणासाठी गेली असताना आरोपी याने तिला फुस लावून पळवुन नेऊन कणकवली येथून बसने सावंतवाडी, तेथून मुंबई, तेथून पुणे, तेथून मिरज, कोल्हापूर असे फिरून दिनांक 28/9/2023 रोजी विजापूर येथे नेऊन तिच्याशी तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्या मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भा. द. वि. कलम ३७६, ३७६(३),३७६(२)(j), 366,365,342,363 व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 4,6,8,12 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(१)(w)(i)(ii), 3(२)(v),3(२)(va) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला ऑक्टोबर 2023 मध्ये अटक करण्यात आली होती.
न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करताना कोणत्याही प्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, फिर्यादी व सरकारी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाव आणू नये अशा अटीसह जामीन मंजूर केला आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!