सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वच ग्रामपंचायती अधिक सक्षम होत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद् घाटन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.

ओटवणे ग्रामपंचायत अधिक सक्षम करण्याचा महायुती सरकारचा मानस आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे परिसरातील जी काही रस्त्यांची अथवा विकास कामे आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करून येथील ग्रामस्थांना सोयीसुविधा पुरविण्यात येतील, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष संजू परब, अशोक दळवी, नारायण राणे, गटविकास अधिकारी नाईक, सरपंच दाजी गावकर, उपसरपंच संतोष कासकर, विकास सावंत, महेश सारंग आदी मान्यवर उपस्थित होते

error: Content is protected !!