कोकण विकासासाठी केवळ वलग्ना नाही तर महायुती सरकारचे योगदान

आमदार नितेश राणे यांची माहिती

बोले तैसा चाले असे आमचे महायुतीचे सरकार आहे. कोकणच्या विकासात हातभार लावण्यात या सरकारचे फार मोठे योगदान आहे. प्रत्येक मतदारसंघ निहाय भरपूर विकास निधी देऊन कोकणी जनतेला जे अपेक्षित आहे ते काम आमचे महायुतीचे सरकार करत आहेत. आज विधानसभेत कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाची घोषणा करून आणि त्या प्राधिकरणासाठी ५०० कोटीची तरतूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी कोकणच्या विकासाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी दिली.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!