सिंधुदुर्गातील बस स्थानकांचा प्रश्न आमदार राणेंनी मांडला विधानसभेत

विधानसभा अध्यक्षांकडून गांभीर्याने दखल

लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान उत्तर देण्याची मंत्र्यांना सूचना

एसटी बस स्थानके सुसज्ज करण्यासाठी २०२२-२३ च्या अर्थ संकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.मात्र ही कामे अपेक्षित पद्धतीने होत नाहीत.ती कधी होणार ? असे विचारताना आमदार नितेश राणे यांनी एसटीच्या प्रवशी वाहतूक करणारी सेवा आणि त्यांच्या फेऱ्या अनियमित आहेत.त्यावर काय उपाययोजना करणार आणि या संदर्भात परिवहन मंत्री आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेणार काय असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला.त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रश्नांवर लक्षवेधी लावून उद्या त्या खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर द्यावे असे सूचित केले.
विधानसभेत राज्यातील बसस्थानकाची दुरुस्ती आणि सोयी सुविधा पुरविण्यासाठी चा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.यावर बोलताना आमदार नितेश राणे यांनी सभागृहात एसटी बस स्थानकांची दुरवस्था कशी झाली आहे हे लक्षात आणून दिले. स्व.बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानाअंतर्गत एसटी बस स्थानके सुसज्ज करा.दोन महिन्यात कामे सुरू होतील असे जरी सांगितले असेल तरी ती कामे गतिमान करावी. त्याच प्रमाणे ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी फेऱ्या नियमित ठेवाव्यात, त्यात दिरंगाई नको. प्रवाशांचा खोळंबा होवू देवू नका अशी मागणी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रश्नांची गंभीर दखल घेवून उद्या विधानसभेत लक्षवेधी घेवून त्यावर उत्तर देण्याचे आदेश केले.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!