मुंबईत जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या वाढवाव्यात

प्रवाशी सवलती पासून वंचित, प्रवास खाजगी बसने – भाई चव्हाण

कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हातून मुंबईत जाणार्या एसटी गाड्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे मुंबईत जा-ये करणार्या प्रवाशांना खाजगी गाड्यांना भरमसाठ तिकीट मोजून प्रवास करावा लागत आहे. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सवलती पासून वंचित रहावे लागत आहे. तरी रा. प. महामंडळाने मुंबईत जा-ये करणार्या एसटी गाड्यांच्या फेर्या वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशी वर्गांकडून होत असल्याचे कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सद्या ३० शयनकक्ष असलेल्या २ गाड्या बांदा-बोरिवली चिपळूण मार्गे तर बांदा-मुंबई कोल्हापूर -पुणे मार्गे जा-ये करीत आहेत. मात्र या दोन्हीही गाड्या आगावू आरक्षणाद्धारे पुर्ण क्षमतेने धावत आहेत. त्यामुळे जिल्हातील प्रवाशांना या गाड्यांमधून प्रवास करता येत नाही, अशी माहिती देऊन चव्हाण म्हणतात, सकाळची मालवण -मुंबई फेरी ही प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीची ठरते. सिंधुदूर्गवासियासह कोकणवासियांची नाळ मुंबईत जोडली असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण न मिळालेले आणि अचानकपणे मुंबईत जाव्या लागणारे प्रवाशी शक्यतो रातराणी गाड्यांतून प्रवास करायला प्राधान्य देतात. मात्र सायंकाळच्या सत्रात उपरोक्त ३ गाड्या व्यतिरिक्त मुंबईत जाणार्या एसटीच्या गाड्या नाहीत.

या प्रवाशांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते. ज्येष्ठ नागरिकांची संख्याही बरीच असते. मात्र सायंकाळच्या सत्रात एसटीच्या मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या अपुर्या असल्याने या प्रवाशांना एसटीच्या विविध सवलती पासून वंचित रहावे लागत आहे. नाविलाजास्तव खाजगी गाड्यांच्या भरमसाठ तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी शासनाच्या विविध तिकीट सवलतीमुळे प्रवाशांचा कल एसटीकडे वळला आहे. त्यामुळे एसटीने प्रवासी वाढीच्या दृष्टीने आणि सवलती प्राप्त प्रवाशांच्या सोयीसाठी दोडामार्ग -कणकवली-मुंबई, शिरोडा-वेंगुर्ले-मुंबई, मालवण-कणकवली-मुंबई अशा फेर्या सुरू कराव्यात. यापैकी काही गाड्या ठाणा, कल्याण, बोरिवली आदी ठिकाणी सोडाव्यात. शयनकक्ष गाडीचे तिकीट जास्त असल्याने त्याऐवजी साध्या, हिरकणी गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!