सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांवर कणकवलीत कारवाई

रविवार सार्वजनिक ठिकाणी “एन्जॉय” करणे पडले महागात
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून रविवार “एन्जॉय” करणाऱ्यांवर काही जणांवर कणकवली पोलिसांनी काल रात्री कारवाई केली. कणकवली मुडेश्वर मैदान या ठिकाणी मद्यपान करून तेथील परिसर अस्वच्छ करणे व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईत “त्या” तळीरामांना समज देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापुढे पुन्हा अशा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आल्याचे समजते. दरम्यान कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, हवालदार मनोज गुरव, राजेश पाटील, आगाव, यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान यातील काहींना कणकवली पोलीस स्टेशनमध्ये देखील रात्री आणण्यात आले होते. मात्र समज देत या तळीरामाना सोडण्यात आले. कणकवली शहरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
दिगंबर वालावलकर/ कणकवली