कणकवली अबॅकस चे राज्यस्तरीय स्पर्धात नेत्रदीपक यश
कणकवली येथील ए न्टि टी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस क्लासच्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रोएॅक्टिव्ह अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये कोल्हापूर , सांगली , सातारा , सिंधुदुर्ग व रत्नागिरी या पाच जिल्ह्य़ांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये कणकवलीच्या ७ मुलांनी ट्रॉफी मिळवण्याचा विक्रम केला व बाकी मुलांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे. तसेच यावर्षीचा बेस्ट अबॅकस सेंटर ह्या विशेष पुरस्काराने या सेंटरला गौरविण्यात आले आहे.
रूचा सावंत, तनया पवार, जागृती खरात,सौम्या ठाकूर, जयेश पाटील, प्रवीण खानविलकर, यश गोसावी ही मुले आपापल्या श्रेणीमध्ये अव्वल ठरली आहेत. जय खरात,अनुज सातवसे,भाग्येश सावंत, स्वर कांचवडे,सारा मेस्त्री, मैत्री पाटील, रूही यादव,कार्तिक शिर्के, ईशान ठाकूर, पियुष रजपूत, भावेश कवडे,मयंक आचरेकर, नारायण रणशूर, भूमिक पाटील,कृतिका सावंत, ईशा चिंदरकर, दिक्षांत सावंत,दुर्वांक राणे,रिद्धी रजपूत, आयुषी पुजारी,अनुश्री पुजारी,कुणाल डगरे,यशिका खानविलकर, अंश आंबेरकर, गार्गी तांबे,श्रावणी पाटील, आर्यन पाटील, रूद्र यादव यांनी चांगल्या कामगिरी करत गोल्ड मेडल मिळवले आहे. ह्या सर्व विद्यार्थ्यांना क्लासच्या संचालिका सौ.पूजा राणे यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व पालक यांच्याकडून मुलांचे कौतुक होत आहे.
कणकवली (प्रतिनिधी)