सारथीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी – आ.सतेज पाटील

नागपूर – हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील काॅग्रेस गटनेते व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सारथीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या फेलोशिपचा प्रश्न उपस्थित केला. चालू वर्षीपासून राज्य सरकार सारथीच्या २०० विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार आहे.तथापि यासाठी विद्यार्थ्यांनी केलेली तयारी लक्षात घेऊन हा शासन निर्णय पुढील वर्षांपासून लागू करण्यात यावा. सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी. तसेच फेलोशिप पात्रता परीक्षेच्या दिवशीच इतरही शासकीय सेवांच्या परीक्षा असल्याने पात्रता परीक्षेची तारीख बदलावी, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना नामदार अजित पवार जी यांनी, फेलोशिप शासन निर्णयासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा करू असे सांगितले.