दीर, जाऊ आणि सासूकडून सुनेला मारहाण

तिघांविरोधात महिलेची तक्रार, मारहाणीत मुलेही जखमी

मुलांच्या भांडणात पालकांनी हस्तक्षेप केला. या वादात सासू, जाऊ आणि दीर यांनी आपल्‍याला काठीने मारहाण केली. तर मुलांवरही कोयता उगारला. यात कोयत्‍याची मूठ लागून दोन मुले जखमी झाल्‍याची फिर्याद करंजे गावातील दर्शना अंकुश करंजेकर (वय ३८, रा.रोहिदासवाडी) हिने आज पोलिसांत दिली.
या प्रकरणी कणकवली पोलिसांनी दर्शना हिचा दीर अजय रामचंद्र करंजेकर (वय ३०), जाऊ सुप्रिया अजय करंजेकर (वय ३०) आणि सासू वनिता रामचंद्र करंजेकर (वय ६०) यांच्या विरोधात मारहाण केल्‍याची फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार या तिघांविरोधात कणकवली पोलिसांनी भादंवि कलम ३२४, ३२३ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दर्शना करंजेकर हिने दिलेल्‍या फिर्यादीनुसार सकाळी नऊच्या सुमारास घरामध्ये लहान मुले खेळत होती. काही कारणाने या मुलांमध्ये भांडण सुरू झाले. त्‍याचा राग अजय करंजेकर याला आला. त्‍याने मुलांना शिवीगाळ सुरू केली. त्‍यावेळी दर्शना हिने शिवीगाळ करू नका असे सांगितले. मात्र वाद वाढला. त्‍यानंतर अजय याने मुलांवर लोखंडी कोयता उगारला. त्‍यावेळी निखिल आणि तन्वी या मुलांनी अजय याला अडविण्याचा प्रयत्‍न केला. यावेळी ११ वर्षीय दर्शना हिला कोयत्‍याची मूठ बसली. तर तन्वी हिच्या डाव्या हाताला मार बसला. हा प्रकार पाहून दर्शना हिने घराबाहेर जाऊन मदतीसाठी आरडाओरड केली. त्‍यावेळी तिचा दीर अजय, जाऊ सुप्रिया आणि सासू वनिता यांनी काठी घेऊन दर्शना हिला मारहाण केली. या मारहाण प्रकरणानंतर दर्शना करंजेकर हिने सायंकाळी कणकवली पोलीस ठाण्यात दीर, जाऊ आणि सासू यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!