सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांना विनम्र आवाहन

संतोष हिवाळेकर पोईप ऑल महाराष्ट्र फेयर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन, पुणे, तर्फे राज्यातील सर्व रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारक यांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशन काळात नागपूर, येथे सोमवार दिनांक 11 डिसेंबर, 2023 रोजी विधान भवनावर रेशन दुकानदारांचा भव्य मोर्चा आयोजित केला आहे.

आम्ही अखिल महाराष्ट्र राज्य रास्त धान्य दुकानदार या संघटनेशी सलग्न असलो तरीही मी अमित गावडे सिंधुदुर्ग जिल्हा संघटना प्रवक्ता या नात्याने सिंधुदुर्ग जिल्हा धान्य व केरोसीन संघटना संपूर्ण कार्यकारणी यांच्या परवानगीने आपल्या प्रत्येकाला असं आवाहन करतोय की संघटना कोणतीही असो आपल्या न्याय व हक्कासाठी लढणार्याला बळ देणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे नागपूर मध्ये निघणाऱ्या मोर्चाही आपल्या अस्तित्वाची लढाई असणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण सर्व दुकानदारांनी सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 या दिवशी स्वेच्छेने आपली रेशन दुकाने एक दिवसासाठी बंद ठेवून नागपूर, येथील मोर्चाला पाठिंबा द्यावा. सोमवारी 11 डिसेंबरला पूर्ण दिवस आपण E-pos मशीन कार्यान्वित करू नयेत अथवा धान्याचे वितरण करू नये.

राज्यातील सर्व रेशन दुकानदारांची एकजूट शासनाला दाखवून देण्यासाठी वैयक्तिक परवानधारकांसहीत महिला बचतगट,सहकारी संस्था,खरेदीविक्री संघ परवानधारक आपल्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे त्यामुळे ऑल महाराष्ट्र फेयर प्राईज शॉपकीपर्स संघटनेने पुकारलेल्या मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्हा धान्य व केरोसीन संघटनेचा १००% पाठींबा सर्वानुमते जाहीर करत आहोत

error: Content is protected !!