कणकवलीत गांजा सदृश्य पदार्थ जप्त

कणकवली पोलिसांची कारवाई

शहरातील नरडवे नाक्यावर गांजा विक्री करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला कणकवली पोलिसांनी रंगेहाथ पकडले. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून काल सायंकाळी ५ वाजवण्याच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी उमाकांत मुनेद्रकुमार विश्वकर्मा (वय २४, रा. मध्यप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून १३० ग्रॅम गांजा सदृश्यपदार्थ जप्त करण्यात आला आहेत. कणकवली पोलिसांना नरडवे नाक्यावर एक संशयित गांजा सदृश्यपदार्थ विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नाक्यावर सापळा रचून होते उमाकांत विश्वकर्मा हा संशयित गांजा सदृश्यपदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असताना मिळून आला. त्या संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या जवळील बॅगमध्ये असलेला १३० ग्रॅम सुमारे ५ हजार रुपये किमतीचा गांजा सदृश्यपदार्थ व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, राजकुमार मुंढे, हवालदार पांडुरंग
पांढरे, चंद्रकांत झोरे, विनोद चव्हाण, सचिन माने आदींनी केली. याप्रकरणी पोलिस सचिन माने याच्या फिर्यादीवरून संशयित उमाकांत विश्वकर्मा याच्यावर अमली पदार्थ विक्री करताना आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!