आचरा हायस्कूल येथे जाळ्यात अडकलेल्या अजगराला जिवदान

आचरा हायस्कूलच्या दगडी कुंपणावर लगतच्या घाडी यांनी आपल्या कलमांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या अजगराची आचरा हायस्कूलचे कर्मचारी भाई बागवे आणि पि के आचरेकर यांनी सुखरूप सुटका केली. त्यांच्यावर औषधोपचार करून त्याला सर्पमित्र स्वप्निल गोसावी करवी नैसर्गिक अधिवासात सोडले.त्यांच्या या कार्याबद्धल मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक गुटूकडे यांनी कौतुक केले आहे.
आचरा–अर्जुन बापर्डेकर