मानवजात म्हणून सर्वांच्या सामिलीकरणाचा विचार करायला हवा.……..इब्राहिम अफगाण,जेष्ठ पत्रकार व लेखक

श्रीनिवास सावंतानी लिहिते रहावे – गजेंद्र आहिरे, सिने दिग्दर्शक

श्रीनिवास सावंत लिखित आश्रितांचा देश पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

मुलूंड, मुंबई :- लेखक म्हणून “आश्रितांचाही देश” ह्या श्रीनिवास सावंत यांच्या चौथ्या पुस्तकाचा व प्रकाशक म्हणून “सायली क्रीएशन” च्या सातव्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता “महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड” येथे संपन्न झाला.

जेष्ठ पत्रकार, लेखक व मेंटॉर मा. इब्राहिम अफगाण, जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक, लेखक, गीतकार व निर्माता मा. गजेंद्र अहिरे, जेष्ठ समाजसेविका, कवियित्री आणि लेखिका मा. वर्षा पवार तावडे, सहआयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका मा. चंद्रशेखर चोरे व विशेष अथिति म्हणून कॉन्सुलेट जनरल ऑफ द किंग्डम ऑफ नेदरलँड्सचे उप उच्चायुक्त थिअरी फन हेल्डेन हजर होते

श्रीनिवास सावंत यांच्या” कँनडा दरम्यानच्या वास्तव्यात त्यांना भेटलेल्या माणसांच्या जीवन कथा आणि व्यथांवर आधारित त्यांनी “आश्रितांचा देश” हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात कथनात मांडलेल्या स्थलांतरितांच्या कथा या त्यांच्या पराजयाच्या वा विजयाच्या कथा नसून त्या त्यांच्या जगण्याच्या कथा असल्याचे श्रीनिवास सावंत यांनी म्हटले.

जेष्ठ पत्रकार लेखक इब्राहिम अफगाण यांनी “जगात वेगवेगळ्या पध्दतीने आश्रित निर्माण केले जात असून जगात देश नाकारलेले लोक आपण पहात आहोत. आपण या पृथ्वीतलावर मानवजात म्हणून एक आहोत की नाही? सर्वांच्या सामिलीकरणाचा मुद्दा कुठे आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत व मानवजातीच्या हितासाठी लेखकाची भूमिका ही किती महत्वाची आहे हे आपण ओळखले पाहिजे” असे प्रतिपादन त्यांनी केले.

सुप्रसिध्द मराठी सिने दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी श्रीनिवास समवेत झालेली मैत्री व महाविद्यालयीन काळात लेखक म्हणून झालेली जडण घडण मांडली. श्रीनिवास मुळे आपण लेखनाकडे वळल्याचे सांगून आज त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते होत असल्याने एक वर्तुळ पुर्ण झाले असल्याचे त्यांनी म्हटले. श्रीनिवासने यापुढेहि सतत लिहिते राहावे असे श्री अहिरे यांनी सांगीतले.

आयुष्यात सर्व प्रकारचे अनुभव घेवून त्याबद्दल लिहायला खूप धाडस लागते असे सांगून वर्षा पवार तावडे यांनी त्यांच्या सतत काहीतरी वेगळे करत राहण्याच्या वृत्तीला सलाम केला. नवनवीन काहीतरी करत राहण्याची ऊर्जा व धाडस श्रीनिवास यांच्यात पुरेपूर असल्याचे वर्षा पवार तावडे यांनी यावेळी म्हटले.

मुंबई मनपाचे सहआयुक्त चंद्रशेखर चोरे यांनी पुस्तक मनःपुर्वक आवडल्याने व इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपविल्याचे म्हटले. या पुस्तकातले खूप सरळ, सोपे, साधे पण भिडणारे लेखन त्यांना खूप भिडल्याचे त्यांनी नमूद केले

थिअरी फन हेल्डन यांनी नेदरलँड व भारत यातील सौहार्दाचे संबंध आणि भारतीयांचा नेदर्लंड्स मधील विकासामधील सहभाग व वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागातून दोन्ही देशाची मैत्री वृदिंगत झाली असे त्यांनी म्हटले

कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रविण दामले आणि विकास सावंत यांनी घेतलेल्या खुसखुशीत मुलाखतीतून श्रीनिवास यांचा जीवनप्रवास उलगडला.

सुधीर चित्ते यांनी कार्यक्रमाचे सुंदर संचलन केले.

किसन चौरे, कोकण नाऊ

error: Content is protected !!