बेटी बचाव, बेटी पढाव अंतर्गत भाजपा मार्फत रांगोळी स्पर्धा

नाव नोंदणी करण्याचे संयोजक मेघा गांगण यांचे आवाहन

भारतीय जनता पक्षाच्या बेटी बचाओ बेटी पढाव या अभियानांतर्गत महिलांसाठी जिल्ह्यास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा लक्ष्मी विष्णु हाॅल कणकवली येथे दिनांक शनिवार 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहेत.
रांगोळीचा विषय – केंद्र सरकारने महिलांसाठी ज्या विविध योजना राबविल्या आहेत. त्याचा समावेश असावा.
यासाठी प्रथम क्रमांक 3000/-
द्वितीय क्रमांक 2000/-
तृतीय क्रमांक 1000/-
उत्तेजनार्थ 5 जणांना प्रत्येकी 500/- रुपये बक्षिस रूपात देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी मेघा गांगण, संयोजक बेटी बचाओ बेटी पढाव यांना संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!