ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये कुष्ठरोग जनजागृती व्याख्यान संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर

कुष्ठरोग किंवा महारोग एक दुर्धर आजार म्हणून या रोगाकडे पाहिले जाते या रोग्याना समाजाकडून भेदभावाची वागणूक दिली जाते परंतु ती सुद्धा माणसेच आहेत आणि त्यांनाही जगण्याचा हक्क आहे हे लक्षात घेत आपण सर्वांनी कुष्ठरोगी व्यक्तींशी आदराने वागून त्यांनाही समाजात समानतेची वागणूक देन्यासाठी जनजागृती व्याख्यान ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत नुकतेच पार पडले, अक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल रिसर्च सोसायटी मुंबई या संस्थेचे कार्यवाह श्री उदय ठकार सर हे प्रमुख व्याख्याते होते सर्वप्रथम ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल संस्था सदस्य अनंत बडे सर आणि आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई यांच्या हस्ते अतिथींचे स्वागत करण्यात आले इयत्ता पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या जनजागृती व्याख्यानात अक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल रिसर्च सोसायटी च्या संयोजका प्रतिभा काथे व सहाय्यक प्रकल्प संयोजिका प्रभा पटवर्धन यांनी कुष्ठरोग लक्षणे आणि त्यावरील उपाय याविषयी माहिती दिली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तसेच संस्था कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल प्रशाला मुख्याध्यापिका सौ अर्चना शेखर देसाई सर्व सहाय्यक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!