बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये 26 /11 हल्ल्यातील शहिदांना मानवंदना

देशभक्तीचा पाया विद्यार्थीदशेतच मजबूत केला पाहिजे !

पोलीस निरीक्षक ऋणाल मुल्ला यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी । कुडाळ : देशभक्तीचा पाया हा विद्यार्थी दशेतच मजबूत केला पाहिजे. त्याचबरोबर व्यसनापासून दूर राहून वेळेचा सदुपयोग करण्याची सवयही विद्यार्थ्यांच्या अंगी बाणविणे गरजेचे आहे,. असे प्रतिपादन कुडाळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमती ऋणाल मुल्ला यांनी केले. त्या मुंबई येथील २६/११ च्या दहशवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि निरपराध नागरिकांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती मुल्ला बोलत होत्या.
मुंबई वरचा २६/११ चा दहशतवादी हल्ला आणि त्यात शाहिद झालेल्याना बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आदरांजली वाहण्यात आली. बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलीस ठाणे व कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच बरोबर आज संविधान दिन आणि राष्ट्रीय छात्र सेना दिन असल्याने हे दिन सुद्धा साजरे करण्यात आले. या कर्यक्रमाला बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर ,सीईओ अमृता गाळवणकर ,डॉ.व्यंकटेश भंडारी, हेड कॉन्स्टेबल संजय कदम, कुडाळ पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद मर्गज , व विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य प्राध्यापक शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पोलीस निरीक्षक ऋणाल मुल्ला यांनी सांगितले, मुंबईवर झालेल्या २६/ ११ चा हल्ला हा फार भीषण होता. संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. ;परंतु या भीषण हल्ल्याला आपल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी सडेतोड उत्तर दिले.आणि दहशतवाद्याना कंठस्नान घातले. .या भीषण हल्ल्यात अनेक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना वीरमरण आले. त्यादिवशी या सर्व अधिकारी व पोलिसांनी आपल्या प्राणाची बाजी लावून मुंबईचा संरक्षण केलं .कसाबसारख्या दहशतवाद्याला जिवंत पकडले . देशभक्तीची ही जाणीव लहानपणापासून विद्यार्थी दशेपासूनच येते. यासाठी सर्वांनी विद्यार्थीदशेत मेहनत घेतली पाहिजे .देशभक्ती म्हणजे सीमेवर जाऊन लढणे नाही तर आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ज्या क्षेत्रात आपण जाणार आहोत त्या क्षेत्रात आपली सुशील उंची गाठणे म्हणजे सुद्धा देशसेवा होय. .डॉक्टर ,इंजिनीयर, नर्स, वकील, शिक्षक, कर्मचारी या माध्यमातून आपण देशाची सेवा करू शकतो. आणि ही सुद्धा देशभक्ती आहे. थोडक्यात आपली प्रत्येक कृती आपलं प्रत्येक कार्य देशाच्या प्रगतीसाठी निष्ठेने अर्पण केलं तर याच्यासारखी देशसेवा नाही असे सांगितले
संविधान दिन व एनसीसी डे बाबत बोलताना ऋणाल मुल्ला म्हणाल्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची जी उद्देशिका तयार केले आणि त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे‌. आपला देश हा विविध जाती धर्म यामध्ये विभागलेला आहे.स्वातंत्र्य, समता ,बंधुता धर्मनिरपेक्षता ही मूल्ये जतन करणे हे आपले कर्तव्य आहे . त्यातच देशाचा विकास प्रगती लपलेली आहे”.
राष्ट्रीय छात्रसेना दिनाचा उल्लेख करून श्रीमती मुल्ला म्हणाल्या, एनसीसी एक त्यागाचे प्रतीक आहे. .ज्या माध्यमाद्वारे आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचीची शिस्त, देशप्रेम,त्यागाची शक्ती संचारते व आपण देश सेवा करण्यासाठी तयार होतो .यात एनसीसीचा जो युनिफॉर्म आहे; तो युनिफॉर्म आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतो. आणि आपल्या जीवनात शिस्त निर्माण करतो. एनसीसी कॅडेट देशाच्या मदतीसाठी केव्हाही तयार असतो आणि असले पाहिजे. तुम्ही सुद्धा या एनसीसीच्या माध्यमातून देशाची सेवा करण्यासाठी नेहमी तयार असला पाहिजे‌ असे सांगत.शुभेच्छा दिल्या.
यावेळी यावेळी मिशेल फर्नांडिस याने संविधानचे वाचन केले त्यांच्या सोबत संविधानाच्या वाचनात सरावाने सहभाग घेतला. मैदानावरील मानवंदना अर्पण करणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले तर 26 /11 च्या घटनेची क्षणचित्रे, संविधान दिन एनसीसी डे या प्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.योगिता शिरसाट -तिळवे यांनी केले. एनसीसीचे महत्व मेता जमदाडे हिने कथन केले. तर उपस्थितांचे आभार विभा वझे यांनी मानले.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ.

error: Content is protected !!