जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीकांत सावंत यांची भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची भेट…

मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी नुकतीच ओरोस येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांचीभेट घेतली. या भेटीदरम्यान श्रीकांत सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासात्मक प्रश्नांबाबत प्रभाकर सावंत यांचे लक्ष वेधले. तसेच खेड्यांचा विकास म्हणजेच सर्वांगीण विकासाचा पाया याबाबत श्रीकांत सावंत यांनी उपस्थित सर्वांचे मार्गदर्शन करताना लक्ष वेधले. यावेळी प्रभाकर सावंत यांनीही श्रीकांत सावंत यांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ते सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले. तसेच मानवता विकास परिषद च्या कार्यास योग्य ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान मानवता विकास परिषद वतीने प्रभाकर सावंत यांचा समर्थ सद्गुरु पाचलेगावकर महाराज यांचे पुस्तक भेट देऊन सत्कार केला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रसन्न देसाई जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे, एन पी मठकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मसुरे प्रतिनिधी





