कणकवलीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांची जयंती साजरी

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जयंती उत्सव सोहळा शिंपी समाज ऐक्यवर्धक संघ कणकवली यांच्यावतीने, संस्थेचे अध्यक्ष सुहास वरणकर आणि कार्यकारणी सदस्य, तसेच सल्लागार मंडळयांच्या उपसस्थितीत श्री ऋषिकेश कोरडे यांच्या हस्ते पूजन करून मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला
यावेळी श्री राजू वर्णे , सेक्रेटरी अभिजीत मिरजकर, सहकार्यवाह श्री ऋषिकेश कोरडे, सौभाग्यवती पूनम कोरडे, श्रीमती प्राची ढेकणे, श्री विनायक महाडिक,खजिनदार किशोर शंकरदास, पूजा गुरुदत्त शंकर दास, पूजा किशोर शंकरदास, संस्थेचे अध्यक्ष सुहास वरून कर, सौभाग्यवती विनिता सुहास वरु णकर, दुर्गेशा सुहास वरूणकर, आदींच्या उपस्थित होते
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करण्याचे हे आठवे वर्ष आहे. संस्थेच्या वतीने गेली वीस वर्ष श्री संत नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव देखील मोठ्या दिमाखाने साजरा केला जातो. हा उत्सव श्री देव काशी विश्वेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्याने श्री देव काशी विश्वेश्वर मंदिर येथे साजरा केला जात होता. कोरोना साथी नंतर हा उत्सव संस्थेचे अध्यक्ष सुहास वरुणकर यांच्या घरी साजरा केला जात आहे.
कणकवली ( प्रतिनिधी)





