गावगाडा या लघु चित्रपटाचं चित्रीकरण खांबाळे सुरू..मंगेश लोके यांनी दिला मुहूर्ताचा क्लाप

आचरा–अर्जुन बापर्डेकर मुलगी शिकवा मुलगी वाचवा हे ब्रीद वाक्य घेऊन समाजातील वंचित घटक आता स्त्री शिक्षणानसाठी पुढे सरसावले आहेत.. खांबाळे ग्रामपंचायतीने वंचित समाजातील स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी गावगाडा या लघु चित्रपटाला निर्मिती मध्ये सहकार्य केले आहे. या प्रसंगी निर्माती अभिनेत्री योगिता भोसले,अभिनेत्री मधुरा गुजर,अभिनेत्री हर्षदा अभिनेते दिपक कदम, डी .वो. पी. राजू राऊत अभिनेते आणि या लघु चित्रपटाचे दिग्दर्शक संजय कसबेकर गुरुनाथ गुरव, डे.सरपंच गणेश पवार ,मंगेश सुद ,पंचायत समिती सदस्य मंगेश जी लोके, नंदकुमार पवार, मंगेश कांबळे,अंबाजी पवार,सतीष चव्हाण, कु.रुद्र ढेकळे, दिलीप ढेकळे, स्वरा ढेकळे
कार्यकारी निर्माते राजेंद्र सावंत कॅमेरा मन धनराज वाघ आदी उपस्थित होते चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्ड सदस्य दिपक कदम म्हणाले की अश्या प्रकारच्या उपक्रमांना सर्वांनी सहकार्याच्या माध्यमातून पाहिलं पाहिजे. खांबाळे ग्रामपंचायतीने हे पाहिलं पाऊल उचललं आहे आणि नेहमीच असे स्तुत्य उपक्रम राबविले आहेत .आणि त्यासाठी ग्रामपंचायतीला अनेक शासनाचे पुरस्कार ही मिळाले आहेत..

error: Content is protected !!